इल्फर्ड मित्र मंडळ
  • सध्या काय चाललंय?
  • ग्रंथ तुमच्या दारी
  • वाचाल तर वाचाल
  • सामील व्हा!
  • कोण आहे रे तिकडं?
  • आठवणी
  • About Us
इल्फर्ड मित्र मंडळाचा १२ वा वार्षिक गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात २ आणि ३ सप्टेंबरला साजरा होत आहे. "गणपती बाप्पा मोरया" चा गजर करण्यासाठी आपण आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रपरिवारासह अवश्य ह्या आपल्या उत्सवात सामील व्हा. 

स्थळ: 
इल्फर्ड VHP मंदिर - 43, Cleveland Road, Ilford. IG1 1EE
उत्सवाची रूपरेषा -
सोमवार, २ सप्टेंबर
6pm - 7pm : प्रतिष्ठापना आणि पूजा
7pm : आरती
त्यानंतर महाप्रसाद
मंगळवार, ३ सप्टेंबर 
6:00 pm - 7:00 pm : गणपती अथर्वशीर्षाची आवर्तने 
आवर्तने झाल्यावर पूजा आणि आरती
त्यानंतर महाप्रसाद​

मराठी भाषा वर्ग ​

मातृभाषा हा खूप मजेशीर विषय आहे. शाळा होती तोपर्यंत भीती वाटायची आणि शाळा सोडल्यावर अभिमान वाटू लागला. आता देश सोडल्यावर तर भरूनच आलं कारण हेच कळेना की आपल्या पोराबाळांना कसं येणार आता हे सगळं.

तुम्हालाही असं वाटलेलं का? किंवा तुमच्या मुलांना, जेवढं येतंय मराठी, त्याला घासून पुसून आणखी लख्ख करावं असं वाटतंय का? थोडंफार आम्हालाही तसच वाटलं. 

भारतीय भाषा संघाने साधारण १० आठवड्यात मराठी लिहिता वाचता येईल अशी सोपी पद्धत शोधून काढली आहे. म्हणूनच आम्ही आता भारतीय भाषा संघाच्या मदतीने  इल्फर्ड मध्ये मराठी भाषेचे वर्ग सुरु केले आहेत व पहिले सत्र सध्या जोमात सुरु आहे.  अधिक माहिती पुढे
अधिक माहिती
चैत्र प्रतिपदा, अर्थात गुढी पाडवा, मराठी नूतन वर्षाची सुरुवात.
पूर्ण वर्षभराचा वारसा नव्याने जपणारी अशी चैत्र प्रतिपदा.
रामनवमीच्या उत्सवाची  सुरुवात.

नवीन वर्षाची सुरुवात  सर्व मित्र परिवार गुढीच्या साक्षीने साजरा केला.

गुढी पडावा आणि आनंद मेळावा

गणपती गेले गावाला ...

Picture
दर वर्षीप्रपमाणे इल्फर्डला आपण दीड दिवसाचा गणेशोत्सव  मोठ्या उत्साहात साजरा केला. "उत्साहात" म्हणण्याचे कारण हे की, अनेक लोकांनी आपल्या घराचा गणपती आहे, अशाप्रकारे मदत केली, स्वतः आनंद घेतला आणि इतरांना आनंदात सहभागी करून घेतले.
नरवणे कुटुंबीयांनी सजावटीची जबाबदारी घेतली, सुनीता बेदी यांनी पूजेच्या तयारीचे काम केले, ऋषीराज आणि प्रतिभा चौधरी यांनी एका दिवशी प्रसाद आणला होता, श्री. राजीव नाईक यांनी दुसऱ्या दिवशी सगळ्यांसाठी प्रसाद आणला , अभिषेकनी भजनाचं आयोजन करून वातावरण मंगलमय केलं तर सौ. जयश्री दंडवते (दंडवते काकू) यांनी पूजा करण्याची पूर्ण जबाबदारी घेतली.

सर्व उपस्थितांनी हॉल स्वच्छ करून स्वच्छ भारत इथेही दाखवला !!
सबका साथ मिळाल्यामुळे गणेशोत्सव झकास झाला 

गणपती बाप्पा मोरया !!!
सविस्तर वृत्तांत आणि फोटो लवकरच उपलब्ध होतील.
तसे आम्ही स्वस्थ बसणाऱ्यातले नाहीत. मित्र मंडळींसोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी आम्ही कायम उत्सुक असतो. गुढी पाडवा, गणपती आणि दिवाळी हे सण गेली कित्येक वर्ष आवर्जून उत्साहाने मंडळात साजरी होतात. ह्या व्यतिरिक्त मराठी नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रपट, खेळ असे बरेच विषय आम्हाला तितकेच भन्नाट वाटतात. सतत काहीतरी नवीन घेऊन येण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न असतो. पुढे काय वाढून ठेवलंय ते जाणून घेण्यासाठी आमच्या ह्या वेबसाईटला किंवा फेसबुक पेज ला अधूनमधून भेट देत जा. 

​मग, काय अजून नवीन विशेष?

Picture
मराठी भाषा वर्ग 
मंडळाचा आणखी एक स्तुत्य उपक्रम. सहभागी झालेल्या सर्व मुलामुलींचे खूप कौतुक आणि त्यांच्या पालकांचे आभार. अधिक माहिती साठी जरूर संपर्क साधा.

    तिकीटं बुक करायची आहेत?

Submit

TRASH CONTENT - PLEASE DO NOT USE THIS

लगीनघाई​

"लग्न जमवण्याच्या वेळेस नवरदेवाची सासू आणि नवरीची सासू आपापल्या घराण्याची वळणं कशी सरळ आहेत हे पटवून सांगतात, आता जे सरळ आहे ते वळण कसे? असो तर भुमितीला बुचकळ्यात टाकणारी सरळ वळणाची ही एक आडवळणी व्याख्या" - पुलंचं "नारायण".
अशाच पण थोड्याश्या आगळ्या वेगळ्या वळणांचा, माप ओलांडणारा असा राजीव आणि मालातीचा लग्नसोहळा आपल्याकडे काल व्यवस्थितपणे पार पडला. सगळ्या वऱ्हाडी मंडळींचे आणि लग्न घडवून आणण्यासाठी अविरत राबणाऱ्या सर्व "नारायण" आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून आभार. तसा मुहूर्त थोडासा हुकला पण उपस्थितांनी घरचं कार्य असल्यासारखं सहकार्य केलं. मानापमानाचा काही प्रकार झाला असल्यास तो हेतुपुरस्सर नव्हता हे आपण जाणतोच. कारण लगीन म्हणजे घाई आली, गडबड आली, नातेवाईक आले, तऱ्हेवाईक आले, आणि चर्चा आल्याच.

वेद प्रोडक्शन आणि समस्त कलाकार, अदिती देशपांडे, ओंकार राऊत, सायली कार्लेकर आणि अशोक सराफ यांनी इल्फर्ड मित्र मंडळाचं, जमलेल्या सर्व लोकांचं, किंबहुना लंडनच्या सर्वच मराठी मंडळांचं आणि तुमच्या आमच्यासारख्या सर्व मराठी रसिकांचं, आपल्या आदरातिथ्याचं खूप कौतुक केलं.

तुम्हालाही कार्यक्रम आवडला असेलच अशी अशा करतो. इथे लाईक करून आपली पसंती कळवू शकताच तसेच काही विशेष सल्ला असेल तर आम्हाला ilfordmandal@gmail.com इथे लिहूनही कळवू शकता.

    ​मंडळाबद्दल माहिती हवी?

द्या पाठवून!

    कट्यारच्या तिकिटासाठी संपर्क

    तुमचं नाव
द्या पाठवून
  • सध्या काय चाललंय?
  • ग्रंथ तुमच्या दारी
  • वाचाल तर वाचाल
  • सामील व्हा!
  • कोण आहे रे तिकडं?
  • आठवणी
  • About Us