इल्फर्ड सार्वजनिक गणेशोत्सवाचे १६ वे वर्ष
आपल्या सगळ्यांच्या वर्षभरातला एक महत्वाचा सण "गणेशोत्सव" !!
आपण इल्फर्ड चा सार्वजनिक गणेशोत्सव 19 आणि 20 सप्टेंबर रोजी साजरा करणार आहोत🙏🏼
आपल्या इल्फर्डच्या गणेशोत्सवातील महाप्रसादासाठी जर कुणाला स्वच्छेने काही देणगी द्यायची असेल (completely voluntary contribution ), त्यांनी दत्ता देवकर (07545104271) / राहुल रसाळ (07762378450) यांच्याशी संपर्क साधावा. आपले स्नेहाभिलाषी इल्फर्ड मित्र मंडळ दसरा मेळावामराठी आमची बोली, मराठी आमची माती ॥
मराठी आमची माय, मराठी आमचा मान ॥ सह्याद्री च्या अंगा खांद्यावर खेळलेल्या कणखर आणि फौलादी मावळयांनी काल आपले दैवत रुद्राचाअवतार श्री श्री श्री शिवाजी महाराज यांचा जयघोष करत आपल्या संस्कृतीचं, धर्माचं आणि मराठी पणाचा जो उत्सव करण्याचा विजयादशमी च्या निमित्ताने घाट घातला होता तो आई भवानी च्या आशिर्वादाने आणि देवा दिकांच्या साक्षीने मोठ्या आनंदात आणि हर्षोल्हासात पार पडला. ढोल, लेझीम, मुलांनी सादर केलेली रामलीला, नऊवारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह तो काय वर्णावा. अयोध्येत परतल्यानंतरचा विजयोत्सव असाच कदाचित झाला असेल. पालखीत बसलेले प्रभु श्रीराम, माता सीता, भ्राता लक्ष्मण आणि हनुमान जी हा सोहळा याची देहा याची डोळा पहात होते. सर्व कार्यकर्त्यांचे, लहान पोरा बाळांचे, ढोल वादन पथकाचे, विश्व हिंदु परिषदेचे, इल्फर्ड मित्र मंडळाचे, जे या सोहळ्याला आले, जे येऊ नाही शकले आणि जे या सोहळ्यास येऊ शकत असुनही आले नाहीत त्या सर्वांचे धन्यवाद आणि आभार. असेच सर्वाचे प्रेम आणि सहकार्य मिळेल ही अपेक्षा. कृपाभिलाषी इल्फर्ड मित्र मंडळ Photo Credits: Abhijit Jadhav ग्रंथ तुमच्या दारीगेल्या दहा वर्षांत दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीची मराठी ग्रंथसंपदा संपूर्ण भारतातच नव्हे, तर जगातील अनेक देशांतल्या घराघरात पोचवल्यानंतर आता ग्रंथ तुमच्या दारी योजना प्रथमच कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि इल्फर्ड मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने लंडन मध्ये सुरु होत आहे.
|
आमच्या FaceBook Page ला "Like" करायला विसरू नका.
रेडब्रीज लायब्ररीत १७५ मराठी पुस्तके तळहातावरचा फोन स्मार्ट झाल्यापासून हल्ली फार कमी लोकांच्या हातात पुस्तक दिसते. त्यातल्या त्यात मराठी पुस्तक अजुनच दुर्मिळ. अशा वातावरणात इंग्लंडमधे मराठी साहित्याचा आस्वाद घेणे सुकर व्हावे म्हणून इल्फर्ड मित्र मंडळाने रेडब्रीज लायब्ररीत मराठी पुस्तके मोठ्या संख्येने आणायचा निर्धार करून आत्तापर्यंत १७५ दर्जेदार पुस्तकांचा संच उपलब्ध करून दिला आहे.
पण इथवरचा प्रवास बराच मोठा ठरला. सुरुवात तर इथून होती की लायब्ररीत पुस्तके ठेवायला परवानगीच मिळत नव्हती. मग त्यांना आपल्या मंडळाबद्दल सांगितलं, मराठी भाषेबद्दल सांगितलं, तेंव्हा कुठे गाडी पुढे सरकली . लोकांकडून पुस्तके व पैसे ह्या स्वरूपात देणग्या मिळाल्या. काहींनी भारतातून येताना स्वतःसोबत पुस्तके आणली. पुढचा एक वर्ष सतत पाठपुरावा करून पुस्तकांची लायब्ररीच्या कॉम्पुटर वर नोंदणी होऊन शेवटी जून २०१७ मध्ये हि पुस्तके आता डौलाने रेडब्रीज सेंट्रल लायब्ररीत विराजमान झाली आहेत. हे सगळं रामायण सांगण्याचा उद्देश इतकाच कि आपण सर्वांनी ही पुस्तके नक्की वाचावीत तरच ह्या उपक्रमाचे सार्थक होईल. प्रतिसाद चांगला मिळाल्यास अजून खूप सारी पुस्तके संग्रहात वाढवू. दिवाळीचा (वाचनीय) फराळ
|