इल्फर्ड मित्र मंडळ
  • सध्या काय चाललंय?
  • ग्रंथ तुमच्या दारी
  • वाचाल तर वाचाल
  • सामील व्हा!
  • कोण आहे रे तिकडं?
  • आठवणी
  • About Us

मराठी भाषा वर्ग 

मातृभाषा हा खूप मजेशीर विषय आहे. शाळा होती तोपर्यंत भीती वाटायची आणि शाळा सोडल्यावर अभिमान वाटू लागला. आता देश सोडल्यावर तर भरूनच आलं कारण हेच कळेना की आपल्या पोराबाळांना कसं येणार आता हे सगळं.

तुम्हालाही असं वाटलेलं का? किंवा तुमच्या मुलांना, जेवढं येतंय मराठी, त्याला घासून पुसून आणखी लख्ख करावं असं वाटतंय का? थोडंफार आम्हालाही तसच वाटलं.

भारतीय भाषा संघाने साधारण १० आठवड्यात मराठी लिहिता वाचता येईल अशी सोपी पद्धत शोधून काढली आहे. म्हणूनच आम्ही आता भारतीय भाषा संघाच्या मदतीने इल्फर्ड मध्ये मराठी भाषेचे वर्ग सुरू केले आहेत.
​
मराठी भाषा आत्मसात करता करताच, या वर्गांमुळे लहान मुलामुलींना देवनागरी लिपी सोप्या पद्धतीने लिहिता वाचता येऊ शकेल. पुढे हिंदी आणि संस्कृत भाषा सुद्धा शिकण्यास सोपी होईल अशी आशा आहे.

​
इल्फर्ड मराठी भाषा वर्गाच्या पहिल्या दोन सत्रांना मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता तिसरे सत्र मे २०१७ पासून सुरु होत आहे. ह्या सत्रात मुलांचे तीन गट असतील:

गट एक: मराठी भाषा लिहिण्या वाचण्याचा पूर्वानुभव नसलेल्या मुलांसाठी
गट दोन: जी मुले याआधीच्या सत्रात शिकलेली आहेत व ज्यांना उजळणीची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी
गट तीन: ज्या मुलांनी याआधीच्या सत्रात चांगली प्रगती दाखवली आहे व जी पुढच्या पायरीसाठी तयार आहेत त्यांच्यासाठी
  • वयोगट... ५ ते १५ वर्ष
  • प्रत्येक गटात जास्तीत जास्त १० विद्यार्थी असतील जेणेकरून मुलांना गरजेनुसार शिकवणे सोपे जाईल.
  • प्रत्येक सत्र १० आठवड्यांचे असेल (दर शनिवारी दुपारी २ ते ३ ह्या वेळात)
  • प्रथम येणारास प्रथम प्रवेश मिळेल (संख्येपेक्षा जास्त नोंदणी झाल्यास पुढील सत्रासाठी waitlist वर ठेवले जाईल)

​अर्थात कुठलंही शिक्षण सातत्याशिवाय शक्य नाही. तेंव्हा पालक म्हणून दर शनिवारी मुलांना भाषा वर्गाला घेऊन येण्याची लहानशी जिम्मेदारी आपण घेताल अशी अपेक्षा आहे.

ह्या भाषा वर्गासाठी कुठलाही शुल्क नाही, परंतु ह्या उपक्रमासाठी लागणाऱ्या खर्चासाठी आपण ऐच्छिक देणगी देऊन हातभार लावू शकता.

    येताय मग आपल्या मुलांना घेऊन मराठी शिकायला? थोडीशी तुमची माहिती हवीये ...

    गट एक: मराठी भाषा लिहिण्या वाचण्याचा पूर्वानुभव नसलेल्या मुलांसाठी गट दोन: जी मुले याआधीच्या सत्रात शिकलेली आहेत व ज्यांना उजळणीची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी गट तीन: ज्या मुलांनी याआधीच्या सत्रात चांगली प्रगती दाखवली आहे व जी पुढच्या पायरीसाठी तयार आहेत त्यांच्यासाठी
Submit

९ जुलै २०१६ च्या अक्षर ओळख वर्गाला मिळाला अप्रतिम प्रतिसाद  

Picture

वेळ व पत्ता ​


वेळ: दर शनिवारी दुपारी २ ते ३ 
Ilford Hindu Centre, 43 Cleveland Road, Ilford IG1 1EE


अधिक माहितीसाठी संपर्क करा : 07813524040 (पल्लवी), 07725565751 (सागर), 07438366643 (कपिल). Email: ilfordmandal@gmail.com 



Gallery


  • सध्या काय चाललंय?
  • ग्रंथ तुमच्या दारी
  • वाचाल तर वाचाल
  • सामील व्हा!
  • कोण आहे रे तिकडं?
  • आठवणी
  • About Us