|
वाचाल तर वाचालतळहातावरचा फोन स्मार्ट झाल्यापासून हल्ली फार कमी लोकांच्या हातात पुस्तक दिसते. त्यातल्या त्यात मराठी पुस्तक अजुनच दुर्मिळ. अशा वातावरणात इंग्लंडमधे मराठी साहित्याचा आस्वाद घेणे सुकर व्हावे म्हणून इल्फर्ड मित्र मंडळाने रेडब्रीज लायब्ररीत मराठी पुस्तके मोठ्या संख्येने आणायचा निर्धार केला आहे. ह्यात लहान मुलांसाठी शैक्षणिक (bilingual books), प्रसिद्ध साहित्यकारांच्या व इतिहासकारांच्या अजरामर कृतींचाही समावेश असेल. आतापर्यंत १७५ पुस्तके रेडब्रीज सेंट्रल लायब्ररीत दिलेली आहेत जी हळूहळू Asian Languages विभागात दिसू लागली आहेत.
पण इथवरचा प्रवास बराच मोठा ठरला. सुरुवात तर इथून होती कि लायब्ररीत पुस्तके ठेवायला परवानगीच मिळत नव्हती. मग त्यांना आपल्या मंडळाबद्दल सांगितलं, मराठी भाषेबद्दल सांगितलं, तेंव्हा कुठे गाडी पुढे सरकली . लोकांकडून पुस्तके व पैसे ह्या स्वरूपात देणग्या मिळाल्या. काहींनी भारतातून येताना स्वतःसोबत पुस्तके आणली. पुढचा एक वर्ष सतत पाठपुरावा करून पुस्तकांची लायब्ररीच्या कॉम्पुटर वर नोंदणी होऊन शेवटी जून २०१७ मध्ये हि पुस्तके आता डौलाने रेडब्रीज सेंट्रल लायब्ररीत विराजमान झाली आहेत. हे सगळं रामायण सांगण्याचा उद्देश इतकाच कि आपण सर्वांनी हि पुस्तके नक्की वाचावीत तरच ह्या उपक्रमाचे सार्थक होईल. प्रतिसाद चांगला मिळाल्यास अजून खूप सारी पुस्तके संग्रहात वाढवू. |
जाहीर आवाहन
ह्या उपक्रमांत आपणही हातभार लावावा ह्यासाठी हे जाहीर आवाहन. सहभागी होण्यासाठी आपल्यासमोर पुढीलपैकी काही पर्याय आहेत:
१. पुस्तक विकत घेण्यासाठी रोख देणगी देता येईल
२. तुमच्या आवडीची नविन पुस्तक भेट म्हणून देता येतील
३. तुमच्या संग्रहातील वापरलेली पण उत्कृष्ट अवस्थेतील पुस्तक देणगी म्हणून देता येतील
४. भारतातून आपल्या (किंवा मित्राच्या) सामनासोबत काही पुस्तके आणता आली तर एकुण खर्च कमी करता येईल
५. आपल्या परीचितांना ह्या उपक्रमाबद्दल कळवून त्यांनाही ह्यात सहभागी करून घेत येईल
आणि हो, एकदा का पुस्तके लायब्ररीत पोचली की ती पुस्तके घेऊन तर नक्की वाचु शकता आणि ह्या प्रयत्नांचे सार्थक करू शकता.
उत्साही पुस्तकप्रेमी प्रशांत परळीकर यांनी वरीलपैकी दुसरा तर शबाना वारणे ह्यांनी दुसरा आणि तिसरा पर्याय निवडला आहे.
मग, तुमचा काय विचार आहे ते लवकरात लवकर खाली कळवा.
कृपया नोंद घ्यावी: देणगी देण्यात येणारी पुस्तकं प्रचारकी किंवा प्रक्षोभक नकोत. लायब्ररीत देण्यासाठी पुस्तके निवडण्यात इल्फर्ड मित्र मंडळाचा निर्णय अंतिम असेल.
जमा झालेली रक्कम / पुस्तके याची संपूर्ण माहिती पाडव्याच्या दरम्यान (mid-April २०१६) जाहीर करण्यात येईल