ग्रंथ तुमच्या दारी
गेल्या दहा वर्षांत दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीची मराठी ग्रंथसंपदा संपूर्ण भारतातच नव्हे, तर जगातील अनेक देशांतल्या घराघरात पोचवल्यानंतर आता ग्रंथ तुमच्या दारी योजना प्रथमच कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि इल्फर्ड मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने लंडन मध्ये सुरु होत आहे.
संकल्पनेचे स्वरूप
- दर्जेदार विविध विषयांची, लेखकांची २५ पुस्तकांची एक पेटी असेल, ज्यामध्ये उत्तमोत्तम, निवडक मराठी अथवा इतर भाषांतील साहित्याचा मराठीत अनुवाद असलेली पुस्तके असतील. सहित्याचे, लेखनशैलीचे जास्तीत जास्त प्रकार जसे कथा, कादंबरी, विनोदी, रहस्य, चरित्र, प्रवासवर्णन, इत्यादी - थोडक्यात सर्व समावेशक ग्रंथ संपदा देण्याचा आटोकाट प्रयत्न असेल.
- एका वाचक कुटुंबाकडे सदर ग्रंथ पेटी 3 महिन्यांच्या कालावधी साठी असेल.
- ज्यांच्या घरी ग्रंथ पेटी आहे असे वाचक कुटुंब आणि त्या ग्रंथ पेटीतून वाचनासाठी सहजगत्या पुस्तक घेवून जावू शकणारे जवळपास वास्तव्यास असणारे अजून एका कुटुंबातील वाचकांना यामुळे वाचनाचा आनंद घेत येईल.
- प्रत्येक ग्रंथ पेटीतील पुस्तके वेगवेगळी असतील.
- कुसुमाग्रज प्रतिष्ठान च्या निवड समिती मार्फत प्रत्येक पेटीत वैविध्यपूर्ण तसेच कोणतेही पुस्तक दुसऱ्या पेटीत सारखे होणार नाही याची दक्षता घेतली जाते.
- दर 3 महिन्यांनी वाचक गटातील ग्रंथ पेटी इतर गटांसोबत बदलली जाते.
- योजनेच्या उपयुक्तता तसेच नाविन्यामुळे वाचकांच्या सक्रिय सहभागाने विस्तार सुरु राहतो. कालांतराने नवीन वाचक जोडत गेल्याने ग्रंथ पेट्या वाढत जातात. असा विस्तार होत असतांना योजनेतील प्रत्येक वाचकाला अविरत वैविध्यपूर्ण वाचनाचा आनंद घेता येतो.
- योजना सुरु करताना किमान ८ ग्रंथ पेट्या विविध भागातील वाचकांसाठी उपलब्ध व्हाव्यात.
- कुसुमाग्रज प्रतिष्ठानला देणगी देऊन एक ग्रंथपेटी तुम्ही पुरस्कृत करावी अशी माफक आपेक्षा आहे. देणगीवर भारतात ८० जी अंतर्गत आयकरात सूट मिळेल.
सहभाग नोंदवा
१. आपला सहभाग नोंदवण्यासाठी लवकरात लवकर पुढील ऑनलाईन फॉर्म भरा (हा फॉर्म फक्त UK साठी आहे याची कृपया नोंद घ्यावी)
२. आपल्याला एका WhatsApp ग्रुप मार्फत पुढील प्रक्रियेबद्दल माहिती दिली जाईल
२. आपल्याला एका WhatsApp ग्रुप मार्फत पुढील प्रक्रियेबद्दल माहिती दिली जाईल
|
समन्वयकसागर डुघरेकर
समन्वयक, ग्रंथ तुमच्या दारी, इल्फर्ड (पुर्व लंडन) WhatsApp: +447725565751 www.ilfordmitramandal.com विनायक रानडे ग्रंथ तुमच्या दारी कुसुमाग्रज प्रतिष्ठान Mobile +91 9922225777 Whatsapp only +91 9423972394 |
ग्रंथ तुमच्या दारी विषयी विषयी थोडेसे
वाचन संस्कृती लयाला जाते आहे आणि आपल्या मराठीचे काही खरे नाही अशी ओरड करणाऱ्यांना करणाऱ्यांना ग्रंथ तुमच्या दारी सारखी योजना म्हणजे एक चांगलीच विस्मयचकित करणारी गोष्ट वाटेल.
जगभरात आज मराठी माणूस नाही अशी भूमी नाही, म्हणजेच ग्रंथ तुमच्या दारी योजनेच्या भरारीला आता आकाशाला गवसणी घालण्यास कोणतीच बंधने नाहीत. जिथे म्हणून मराठी शब्द, मराठी भाषा आहे, मराठी माणूस आहे तिथे तिथे आमची योजना जावी अशी आमची इच्छा आहे. एका छोट्याशा कल्पनेला आज जो प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तो उत्तरोत्तर वाढावा हीच आमची संकल्पना आहे.
भारता बाहेरील आपल्या देशातील मराठी वाचकांसाठी ग्रंथ तुमच्या दारी योजना सुरु करण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान ला आपला सक्रिय सहभाग लाभाव हि विनंती.
वाचनालयाच्या समृद्धीसाठी प्रत्येकाने त्याच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक खरेदीसाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानला यथा योग्य देणगी द्यावी या आवाहनाला उस्फुर्त तसेच उदंड प्रतिसाद मिळाला. वाढदिवस, एकसष्ठी, पंच्याहत्तरी, सहस्त्र चंद्र दर्शन तसेच दिवंगत आप्तेष्टांच्या स्मरणार्थ अशा अनेक प्रसंगानुरूप मिळालेल्या भारतात ८० जी अंतर्गत आयकरात सूट असलेल्या देणग्यांमुळे असंख्य मराठी वाचकांना त्यांच्या निवासी भागात, कार्यालयात, दवाखान्यात अशा त्यांच्या जवळपासच्या भागात वाचनासाठी विनामोबदला विनासायास उपलब्ध होत आहेत.
मराठी वाचक जेथे, ग्रंथ तुमच्या दारी तेथे .
ग्रंथ तुमच्या दारी ची विक्रमी घोडदौड . . . 2 कोटी रुपयांची ग्रंथ संपदा महाराष्ट्र, गोवा, गुजराथ, दिल्ली, सिल्व्हासा, तामिळनाडू, कर्नाटक तसेच भारताबाहेर दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झरलॅन्ड, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, वॉशिंग्टन DC, ओमान , बे एरिया सॅनफ्रान्सिस्को , मॉरिशस , सिंगापूर . .
लवकरच अनेक देशात . . .
For more details please contact:
Vinayak Ranade
Mob - +91 99 22 22 5777
WhatsApp only - + 91 9423972394
Email - [email protected]
Blog - http://granthtumchyadari.blogspot.in/