कोण आहे रे तिकडं?
हे इल्फर्ड नक्की कुठेशी आहे ह्याची ज्यांना कल्पना नाही, त्यांच्यासाठी हा गूगल नकाशा. स्पष्ट सांगायचं झालं तर इंग्लंडच्या राणीच्या राज्याची राजधानी लंडन मधलं इल्फर्ड हे एक उपनगर. साधारण २००० सालापासून मराठी माणसांना ह्या भागाचा शोध लागला आणि बघता बघता हमरस्त्यावर, ट्रेन मध्ये, मॉल मध्ये कानावर सहजच मराठी ऐकू येऊ लागलं.
इल्फर्ड आणि आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या, अति उत्साही लोकांनी गेली कित्येक वर्ष सुरु ठेवलेला उपक्रम म्हणजे इल्फर्ड मित्र मंडळ. मंडळाच्या निमित्तानं जोडले गेलेल्या या कुटुंबांनी मिळून आज वर खूप सारे कार्यक्रम आयोजित केलेत आणि पुढे येणाऱ्या काळात पण करत राहतील.
एकूण काय? तर एकत्र येऊन मजा करायचं आणखी एक कारण. नाही म्हणालं तरी महाराष्ट्रामधून असल्यामुळं या मंडळावर मराठीचा प्रभाव खास आहेच पण तरीही मराठीच असण्याचं बंधन नाही. नवे मित्र आणि नव्या ओळखी करायला सार्वजण कायम तयार आहोत.
थोडेसे अति उत्साही, बरेचसे पेटू, आणि भरपूर बोलणारी अशी ही आम्ही मंडळी.
तर ... बघताय काय? सामील व्हा!